शेतकऱ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करता यावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अचूक माहिती देऊन शेतकऱ्यांचे प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढविण्याचे उद्दीष्ट ॲग्रोवनने ठेवले आहे. ॲग्रोवनला वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यमात मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांमध्ये ब्रॅंडची लोकप्रियता वाढतच आहे. ॲग्रोवन आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविण्याचा निर्णय घेतला आहे. शेती आणि ग्रामिण विकास तसेच कृषी बाजाराविषयची संशोधक, संवेदनशील आणि सखोल वार्तांकनामुळे ॲग्रोवनची लोकप्रियता टिकून आहे. शेतीच्या विविध पैलुंविषयी अधिकारवाणीने अचूक आणि निष्पक्ष माहिती पोचवणारे हे माध्यम आहे. नवीन ट्रेंड्स, चांगल्या पीक पद्धती आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची स्पष्टपणे मांडणी करत आहे. ॲग्रोवन शेती आणि शेतमाल बाजारासह डेअरी, पोल्ट्री, मासेमारी आदी संलग्न क्षेत्रांची अचूक माहिती पोचवित आहे. ॲग्रोवन हे शेतकऱ्यांचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते.